मुंबई. Thane Crime : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या प्रेयसीला तिच्या घरातच जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात 17 वर्षीय मुलगी सुमारे 80% भाजली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
ठाण्यातील कापूरबावडी परिसरात ही घटना घडली. एका 17 वर्षीय मुलाने त्याच्या 17 वर्षीय मैत्रिणीला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुलगी घरात एकटी असताना अचानक तिच्या घरातून धूर येऊ लागला. त्यानंतर कुटुंबातील सदस्य घटनास्थळी धावले असता त्यांना मुलगी आगीच्या ज्वालांमध्ये ओरडताना दिसली. त्यावेळी तिचा मित्र घरातच होता.
दोघांमध्ये आधीपासून सुरू होता वाद-
कापूरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण माने यांनी सांगितले की, 17 वर्षीय आरोपी हा पीडित मुलीचा मित्र आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप नोंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला दोघांमधील पूर्ववैमन्स्यातून झाला असावा. आरोपी आपल्या अल्पवयीन प्रेयसीच्या घरी गेला व तिच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला आग लावली.
80 टक्के भाजली मुलगी-
या घटनेत मुलगी 80 टक्के भाजली आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला होता. तथापि, मुलीच्या जबाबानंतरच घटनेमागील खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
आरोपीला अटक -
कापूरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण माने म्हणाले की, 17 वर्षीय आरोपी हा त्या पीडित तरुणाचा मित्र आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
