जेएनएन, मंबई: मुंबईतील गोरेगाव येथे एआयआयएफए (आयफा) आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात महाराष्ट्र शासन आणि स्टील व सहाय्यक उद्योगासंबंधित कंपन्यांसमवेत 9 सामंजस्य करार करण्यात आले. या करारांद्वारे एकूण ₹80,962 कोटींची गुंतवणूक होणार असून, 90,300 रोजगार संधी निर्माण होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

कंपन्या, गुंतवणूक आणि रोजगार:

  • सुमेध टूल्स प्रा. लि. (गडचिरोली) - गुंतवणूक ₹2000 कोटी आणि 1500 रोजगार संधी  
  • हरिओम पाईप्स (गडचिरोली) - गुंतवणूक ₹3135 कोटी आणि 2500 रोजगार संधी
  • आयकॉन स्टील इंडिया प्रा. लि. (चंद्रपूर) - गुंतवणूक ₹850 कोटी आणि 1500 रोजगार संधी
  • रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा.लि. (गडचिरोली) - गुंतवणूक ₹25,000 कोटी आणि  20,000 रोजगार संधी
  • जयदीप स्टील वर्क्स इंडिया प्रायव्हेट लि. (नागपूर) - गुंतवणूक ₹1375 कोटी आणि 600 रोजगार संधी
  • जी. आर. कृष्णा फेरो अलॉयज प्रा. लि. (चंद्रपूर) - गुंतवणूक ₹1482 कोटी आणि 500 रोजगार संधी
  • एनपीएसपीएल अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल(अथा ग्रुप) (छत्रपती संभाजीनगर) - गुंतवणूक ₹5440 कोटी आणि 2500 रोजगार संधी
  • फिल्ट्रम ऑटोकॉम्प प्रा. लि. (सातारा) - गुंतवणूक ₹100 कोटी आणि 1200 रोजगार संधी 
  • जिंदाल स्टेनलेस (रायगड) - गुंतवणूक ₹41,580 कोटी आणि 60,000 रोजगार संधी

या गुंतवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ग्रीन स्टीलमध्ये महाराष्ट्र सर्वांत मोठी भूमिका बजावेल - मुख्यमंत्री

महाराष्ट्राला केवळ स्टील उद्योग क्षेत्रातच नव्हे तर ग्रीन स्टील उद्योग क्षेत्रातही देशातील सर्वोत्तम राज्य बनवायचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मिशन ग्रीन स्टीलमध्ये महाराष्ट्र सर्वांत मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - Gold Price: अबब! सोन्याचा भाव जाणार 2 लाखांच्या पार?