जेएनएन, मुंबई. राज्यात मागील अनेक वर्षांपासून महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. अखेर आज मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील पालिंकाच्या निवडणुकांचा (BMC Election) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.  राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत सह्याद्री आथिती गृहात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर कार्यक्रम करत (State Election Commissioner Press) आहेत.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आढळले आहेत.
  • दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टार करण्यात आले आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10 हजार 111 मतदार केंद्र उभारण्यात येणार आहेत.
  • मताधिकार अॅप तयार करण्यात आले आहे.
  • मतदानाच्या 48 तास आधी प्रचारावर निर्बंध राहणार आहेत.

महानगर पालिकांचा निवडणूक कार्यक्रम

  • नामनिर्देशन दाखल - 23 डिसेंबर
  • नामनिर्देशन अंतिम तारीख- 30 डिसेंबर
  • छाणणी - 31 डिसेंबर
  • नामनिर्देशन वापस - 2 जानेवारी
  • निवडणूक चिन्ह - 3 जानेवारी 2026
  • मतदान - 15 जानेवारी
  • मतमोजणी - 16 जानेवारी

महाराष्ट्रातील महानगरपालिकांची नावे

  • अहिल्यानगर महानगरपालिका
  • अकोला महानगरपालिका
  • अमरावती महानगरपालिका
  • भिवंडी निजामपूर महानगरपालिका
  • बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation)
  • चंद्रपूर महानगरपालिका
  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
  • धुळे महानगरपालिका
  • इचलकरंजी महानगरपालिका
  • जळगाव महानगरपालिका
  • जालना महानगरपालिका
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका
  • कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation)
  • लातूर महानगरपालिका
  • मालेगाव महानगरपालिका
  • मीरा भाईंदर महानगरपालिका
  • नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation)
  • नांदेड वाघाळा महानगरपालिका
  • नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation)
  • नवी मुंबई महानगरपालिका
  • पनवेल महानगरपालिका
  • परभणी महानगरपालिका
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका
  • पुणे महानगरपालिका ( Pune Municipal Corporation)
  • सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
  • सोलापूर महानगरपालिका
  • ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation)
  • उल्हासनगर महानगरपालिका
  • वसई विरार महानगरपालिका

हेही वाचा - BMC Election 2025: भाजप 150 जागांवर तर शिंदे गट 100 पेक्षा अधिक जागांवर आग्रही, महायुतीत जागावाटपावरून संघर्ष?