जेएनएन, मुंबई. Sanjay Raut On Devendra Fadnavis: राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. निवडणुकीचे वारे वाहताच राजकीय वातावरण तापायला सुरु झाले आहे. अनेक पक्ष युती - आघाडी करण्याचे पर्यंत करत आहे. यातच आता शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांनी आगामी बीएमसी निवडणुकीबद्दल भाजपाच्या युतींबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

कोणासोबत युती करायची हा त्यांचा निर्णय 

आगामी बीएमसी निवडणुकीबद्दल शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, "निवडणुका लढवण्यासाठी प्रत्येक पक्ष आपली रणनीती बनवतो आणि आम्हीही तेच करू. जर देवेंद्र फडणवीस एखाद्याशी लढण्याबद्दल किंवा युती करण्याबद्दल बोलत असतील तर तो त्यांचा युतीचा निर्णय आहे, त्यांचा निर्णय आहे. पण ते कोणासोबत युती करणार… अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदेंची सेना भाजपाचीच आहे, असा दावा राऊतांनी केला.

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली 

तसंच, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केलेल्या टीकेबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की,, "मल्लिकार्जुन खरगे यांनी योग्यच सांगितले आहे. जर खोटे बोलणाऱ्यांना नोबेल पुरस्कार देण्याची योजना असेल तर फक्त एकच नाव समोर येईल - आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ते खोटे बोलण्याच्या आधारावर 11 वर्षे सत्तेत आहेत. त्यांनी देशाला काय दिले, लोकांना काय मिळाले? बेरोजगारी, महागाई वाढत आहे. शिक्षण व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. दहशतवाद वाढत आहे, पाकिस्तान आपल्याला आव्हान देत आहे. 11 वर्षांत तुम्ही काय केले? देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे."

हेही वाचा - BMC Election 2025: मनसे-शिवसेना (यूबीटी) युतीच्या चर्चेदरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट