जेएनएन, मुंबई. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित (Shiv Sena Dasara Melava Teaser) झाला आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर अकांउट वर संबंधित व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओला शिवसेनेचा दसरा मेळावा ‘सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त, भगवे विचार आणि भगवंच रक्त…’ या असे शिर्षक देण्यात आले आहे.
शिवसेनेत फूट
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाला उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय देताना शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्यामुळे शिवसेनेचे शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पक्ष निर्माण झाले आहेत. आता परंपरेनुसार शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईत होत आहे. यंदाही ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांचे मेळावे होत आहेत. या मेळाव्याची जोरदार तयारी दोन्ही पक्षाकडून सुरु आहे.
शिवसेनेने टीझर प्रदर्शित
यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरची सुरुवात ही ‘लांडग्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ, जळून झाले खाक अशी शिवसैनिकाची आग, खेचून आणलाय परत धनुष्यबाणाचा मान, उंच होती उंच राहिल भगव्याची शान’ अशी होत आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) September 30, 2025
सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त,
भगवे विचार आणि भगवंच रक्त...
दिनांक - २ ऑक्टोबर, २०२५
ठिकाण - आझाद मैदान, मुंबई
वेळ - सायंकाळी ६ वाजता#Shivsena #EknathShinde #Maharashtra pic.twitter.com/tdlOKoF8qu
शिवसेनेचा दरसा मेळावा कधी?
शिवसेनेचा दसरा मेळावा हा 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. सायंकाळी 6 वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे?
एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता काही दिवसांवर मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे या मेळाव्यात ते शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांची नजर लागली आहे.