जेएनएन, मुंबई: राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीनंतरही मदत खात्यात न पोहोचल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार थेट मैदानात उतरले आहे. सोबतच राष्ट्रवादी पक्षाचे  कार्यकर्ते सरकारविरोधात मैदानात उतरले आहे. अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत न मिळाल्याचा आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राज्यभर काळी दिवाळी साजरी केली आहे.

‘काळी दिवाळी’ आंदोलनाची पार्श्वभूमी

सप्टेंबर महिन्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकं सडून गेल्याने शेतकरी हतबल झाले. सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केलं असले, तरी प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या काळातही शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रस्त्यावर उतरला आहे.

राज्यभर आंदोलन! 

मुंबईच्या वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे आकाशकंदील हातात घेऊन आंदोलन करण्यात आले. पुण्यात, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि "ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू" असा इशारा देण्यात आला.  सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगरसह अनेक जिल्ह्यांतही ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीची प्रमुख मागणी! 

    1. ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा  
    2. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी 
    3. हेक्टरी किमान ₹50000 मदत द्यावी  
    4. तुटपुंजी मदत बंद करून वास्तविक नुकसान भरपाई द्यावी.

    हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांची प्रतिक्षा संपली! अखेर सरकारने घेतला मोठा निर्णय