जेएनएन, मुंबई: Ladki bahin Scream: विधानसभा निवडणुकीत महायुतीने सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकार स्थापन होऊन चार महिने उलटूनही राज्यातील महिलांना 2,100 रुपयांचा एकही हप्ता मिळालेला नाही. यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना 2100 रुपये हप्ता देण्याच्या आश्वासनावर मोठं विधान केलं आहे.
जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करेल
सध्या महायुती सरकार ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा 1,500 रुपये देत आहे. यावरून विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. यादरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच लाडकी बहीण योजनेच्या 2,100 रुपयांच्या हप्त्याबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले की, महायुती सरकार निवडणूक जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करेल.
लाडकी बहिण योजनेचा हप्ता 2100 कधी होणार? When will Ladki bahin Scheme Installment 2100?
राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यानंतर या योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी मासिक मदत 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येईल. आम्ही जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करू. ते म्हणाले की, अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 1,600 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे. यंदा 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे. त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.