जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र सरकारने बुधवारी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची राज्याचे नवे पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती केली. विद्यमान डीजीपी रश्मी शुक्ला पुढील वर्षी 3 जानेवारी रोजी निवृत्त होतील आणि निवृत्तीनंतर दाते राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.

1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले दाते यांनी यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक म्हणून काम पाहिले होते आणि अलीकडेच त्यांना महाराष्ट्र केडरमध्ये परत पाठवण्यात आले. 26/11 च्या हिरो म्हणून गौरवल्या जाणाऱ्या दाते यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील भूमिकेबद्दल दाते यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले.

सदानंद दाते यांच्याविषयी

राज्य सरकारने प्रशासकीय सातत्य, अनुभव आणि कायदा-सुव्यवस्थेतील दीर्घ कारकीर्द लक्षात घेऊन सदानंद दाते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे .दाते हे कडक शिस्त, व्यावसायिकता आणि आधुनिक पोलीसिंगवर भर देणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी केली असून, संवेदनशील प्रकरणांतील हाताळणी आणि संघटनात्मक कौशल्यासाठी त्यांची विशेष दखल घेतली जाते.

पोलीस महासंचालक या पदावर सदानंद दाते यांची नियुक्ती

पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांचा पदावधी 03 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. त्यास अनुलक्षून, संघ लोकसेवा आयोगाच्या “Empanelment Committee" यांनी शिफारस केलेल्या Panel मध्ये समाविष्ट असलेल्या सदानंद वसंत दाते, भा.पो.से. (महा.:  1990), यांची “पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य (HoPF)" या पदावर, याद्वारे, नियुक्ती करण्यात येत आहे, असे निवेदन शासनाकडून काढण्यात आले आहे.

    पोलीस महासंचालक पदाचा कार्यकाळ दोन वर्ष  

    सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भाधीन न्यायनिर्णय व आदेश यांच्या अनुसार “पोलीस महासंचालक (HoPF)” या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या भा.पो.से. अधिकाऱ्याचा पदावधी हा, सेवानिवृत्तीची तारीख कोणतीही असली तरी (irrespective of the date of superannuation), दोन वर्षाचा आहे. त्या अनुसार सदानंद वसंत दाते, भा.पो.से., यांचा  पोलीस महासंचालक या पदावरील पदावधी हा उक्त पदावरील नियुक्तीपासून पुढील दोन वर्षांचा असेल.