जेएनएन, मुंबई: मुंबई ते रत्नागिरी ते सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूकीस राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. माझगाव भाऊचा धक्का (Mazgaon Bhaucha dhakka) येथे एम टू एम प्रिन्सेस या रो-रो कंपनीच्या माध्यमातून ही सेवा सुरू (Ro-Ro service) होणार आहे.
वेळ होणार कमी
या रो रो सेवा सुरू होण्यापूर्वीची पूर्वतयारीची पाहणी बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. सागरी जलमार्गाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी तीन तास व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी पाच ते सहा तास इतका अवधी लागणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विविध परवानग्या मिळाल्या
कोकणवासीयांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. या वाहतुकीला केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विविध परवानगी मिळाली आहे. या रो रो सेवासाठी अनेक वाहतूक कंपन्या पुढाकार घेऊन सेवा देण्याचे नियोजन करत आहे, अशी माहिती राणे यांनी दिली आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवास वाढणार
मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी जलवाहतूक मार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईपासून या मार्गावर प्रवासी सागरी जलवाहतूक प्रथमच सुरू होत आहे. ही वाहतूक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे असेही राणे यांनी सांगितले आहे.
रो-रो प्रवासी जलवाहतूक सुरू
दरम्यान, आवश्यक पूर्व तयारी झाली असली तरी सागरी वाहतुकीसाठी समुद्री वातावरण या बाबी तपासून ‘एम टू एम प्रिन्सेस’ कंपनीची रो-रो प्रवासी जलवाहतूक सुरू करणार आहे, अशी माहिती जलवाहतूक सेवा कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा - Ganeshotsav 2025 Live Updates: महाराष्ट्रात सुख-समृद्धी नांदो, मुख्यमंत्र्यांनी गणरायाला घातले साकले