जेएनएन, मुंबई: मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या मराठा समाज्याच्या उपसमितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या नव्या समितीच्या अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या  समितीत अनेक महत्त्वाचे मंत्री आणि नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

अशी आहे समिती!

  1. राधाकृष्ण विखेपाटील, जलसंपदा मंत्री - अध्यक्ष
  2. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री - सदस्य
  3.  गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री - सदस्य
  4. दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री - सदस्य
  5. उदय सामंत, उद्योग मंत्री - सदस्य
  6. शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री - सदस्य
  7. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री - सदस्य
  8. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री - सदस्य
  9. माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री - सदस्य
  10. मकरंद जाधव, मदत व पुनर्वसन मंत्री - सदस्य

अशी समिती राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

समितीचे काम!
ही उपसमिती मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागण्यांचा सखोल अभ्यास करणार आहे. यासाठी विविध स्तरांवर चर्चा, कायदेशीर सल्लामसलत आणि धोरणात्मक निर्णयांची आखणी करणार आहे.

आरक्षणाची मागणी!
अनेक वर्षापासून   मराठा समाजाला  आरक्षण मिळावं यासाठी राज्यभर आंदोलनं सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चांमुळे सरकारवर मोठा दबाव आला होता. याआधीही मराठा समाजाच्या मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती, मात्र ती समिती प्रभावीपणे काम करू शकली नाही. त्यामुळेच आता महायुती सरकारने नव्याने समितीचे पुनर्गठन केले आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणांना ऑगस्टचा ₹1500 हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर