एजन्सी, नवी दिल्ली. Dhananjay Munde: संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि एका खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. यावरुन विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता धनंजय मुंडे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
तर मी मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यास तयार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारल्यास …तर मी मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यास तयार असल्याचे मंत्री Dhananjay Munde यांनी म्हटले आहे.
9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या
बीड जिल्ह्यातील एका पवनचक्की कंपनीकडे पैशांची मागणी करणाऱ्या काही व्यक्तींनी खंडणीच्या बोलीला विरोध केल्याच्या आरोपावरून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार करुन त्यांची निर्घृण हत्या केली होती.
माझी नैतिकता माझ्या लोकांप्रती
"जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी आहे असे वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा. मी पद सोडण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही हे त्यांनी ठरवावे. गेल्या 51 दिवसांपासून मला लक्ष्य केले जात आहे." नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुंडे असं म्हणाले.
हेही वाचा - नवी क्रांती: अतिदुर्गम भागातील गावांनाही मिळणार आता आरोग्य सुविधा, काय आहे ही अत्याधुनिक तरंगती रुग्णवाहिका
माझी नैतिकता माझ्या लोकांप्रती
"माझी नैतिकता माझ्या लोकांप्रती असलेल्या माझ्या प्रामाणिकपणामध्ये रुजलेली आहे. मी पूर्ण प्रामाणिकपणे बोलतो. मी स्वतःला नैतिकदृष्ट्या दोषी मानत नाही. जर मी दोषी असेल तर माझे वरिष्ठ नेते मला तसे सांगतील," असेही धनंजय मुंडे पुढे म्हणाले.