जेएनएन, मुंबई. College Election In Maharashtra: महाविद्यालयात गुन्हेगारी वर्तनला आळा घालण्यासाठी 1994 मध्ये बंद केलेल्या निवडणुका (College Election) पुन्हा सुरू होणार आहे. महाविद्यालयीन निवडणुकाच बंद करण्याचे धोरण तत्कालीन राज्य शासनाने स्वीकारले होते.

सरकारनं दर्शवली सकारात्मकता

राज्यात गुन्हेगारी वर्तन वाढीस लागल्याचे कारण पुढे करत कॉलेज मधील निवडणुका बंद केले होते. राज्यात आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे  राष्ट्रवादी विचाराचे सरकार आहे, त्यामुळे राज्यात कॉलेजमधील निवडणुका बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.

राष्ट्रवादाचे बीजारोपण करण्याचे आव्हान 

देशात आणि राज्यात अराजकतावादी मंडळी वायुरूपी युवा प्रदूषित करण्याचा प्रयत्न करीत आहे, माओवादी नक्षलवादी विचार आता शहरात, कॉलेज कॅम्पस मध्ये नेऊन संविधान आणि राष्ट्रीय संस्थानविरुद्ध बंड पुकारण्याचे प्रयत्न सुरू आहे. अराजकतावादी ताकतींनी उभे केलेले विचारांचे प्रदूषण नष्ट करून राष्ट्रवादाचे बीजारोपण करण्याचे आव्हान असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी छात्रसंघ निवडणुकाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

    महाविद्यालयात निवडणुका घेतल्यामुळे

    राज्यातील महाविद्यालयात निवडणुका घेतल्यामुळे लोकशाही प्रक्रिया खऱ्या अर्थाने राबवली जाईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

    कॉलेजमध्ये निवडणुका होण्याची गरज 

    शिक्षणाच्या क्षेत्रात शैक्षणिक मुद्यांवर आधारीत आणि नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चांगला वातावरणात तयार करण्याची गरज आहे. विद्यापीठ कायद्यानुसार आगामी निवडणुका कॉलेजमध्ये होण्याची गरज आहे, असे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.