जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मेळावा मुंबईतल्या गोरेगाव येथे नेस्को मैदानात पार पडला. या मेळाव्यात पक्षाचे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) निवडणूक आयोगावर (Election Commission) टीका केली. यावेळी त्यांनी चार व्हिडिओ लावले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना एक व्हिडिओ होता. तर इतर व्हिडिओ सत्ताधारी आमदारांची होती.

राज ठाकरेंनी मोदींचा व्हिडिओ लावला

माझ्याकडे नरेंद्र मोदींचं एक भाषण आहे. त्यात शेवटची दहा सेकंद नीट ऐका. असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींचा व्हिडिओ लावला. 

मै आज सार्वजनिक रुपसे भारत के इलेक्शन कमिशन को गंभीर शिकायत कर रहाँ हूँ. अगर इलेक्शन कमिशन एक अंपायर के नाते निष्पक्ष भावसे आनेवाले चुनाव कराने की हिंमत रखता है तो ध्यानसे सुने. मेरा भाषण इलेक्शन कमिशन को पहुंचाया जाये. गुजरातमें शांतीसे चुनाव होता है तो क्रेडिट इलेक्शन कमिशन को नहीं जाता है, महाराष्ट्र, बिहार, बंगाल इन मे चुनाव शांतीसे होते तभी क्रेडिट इलेक्शन कमिशन को जाता है. हमारे लोगोंपर झुठे मुकदमे लगाये जा रहे हैं. आप अपनी जिम्मेदारी को सही ढंग से निभाये. मैने कुछ सिटो के नाम लिये थे, बंगाल, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशमें यहीं होने वाला है. इलेक्शन की जिम्मेदारी नहीं है? की इलेक्शन शांतपूर्ण ना हो. प्रधानमंत्री से भी आपके पास ज्यादा हक है. तो आप करते क्यूँ नही? मेरी बात से बुरा लगता है तो केस कर दो. लेकिन निष्पक्ष चुनाव करना आपकी जिम्मेदारी है. मै बहुत गंभीर आरोप कर रहाँ हूं. लोकतंत्र ऐसे नही चलता. 30 तारीख की चुनाव मे रिगिंग हुआ है. असं मोदी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. मी काय वेगळं बोलतो आहे का? असा यावर राज ठाकरे यांनी सवाल केला.

आमदारांचे व्हिडिओ

राज्यातील मतदार याद्यांतील घोळावर बोलताना राज ठाकरे यांनी पैठणचे आमदार भुमरे यांच्यासह राष्ट्रवादी सतिश चव्हाण, भाजपा मंदा म्हात्रे, शिवसेना संजय गायकवाड यांचे व्हिडिओ दाखवले. यात ते त्यांच्या मतदार संघातील मतदार याद्यातील घोळावर बोलताना दिसत आहेत.  

    राज ठाकरेंचा आरोप

    ‘मला तर कळलं आहे की आत्ताच्या निवडणुकांसाठी 1 जुलैला निवडणुकांसाठी यादी बंद केली आहे. जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत 8 ते साडेआठ लाख मतदार, ठाण्यात, पुण्यात अशा प्रत्येक ठिकाणी भरले आहेत. अशा निवडणुका होणार आहेत तर मग प्रचार कशाला करायचा? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. 

    हेही वाचा -Raj Thackeray: राज्यात 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले - राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप