एजन्सी, पालघर. Palghar News: पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यात एका महिलेवर पोलिस कॉन्स्टेबलने बलात्कार केला आहे. या आरोपाखाली पोलिसांनी या 40 वर्षीय कॉन्स्टेबलला अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
कासा पोलिस ठाण्यात घडली घटना
पालघर ग्रामीण पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही कथित घटना गेल्या आठवड्यात कासा पोलिस ठाण्यात घडली. (Kasa police station Rape case)
जबाब नोंदवण्यासाठी गेली अन्
ती महिला एका प्रकरणासंदर्भात तिचा जबाब नोंदवण्यासाठी तिथे गेली होती. त्याने सांगितले की, कॉन्स्टेबलने तिच्यावर आवारात बलात्कार केला.
बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॉन्स्टेबलविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आणि रविवारी त्याला अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. कासा पोलिस स्टेशनच्या प्रभारींची बदली करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
