जेएनएन, नाशिक. Nashik Accident: नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सप्तशृंगी गडाच्या घाटातून एक गाडी तब्बल 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची पथकं आणि स्थानिक पोलीस दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरी अतिशय खोल असल्याने बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. गाडी दरीत सुमारे 700 ते 800 फूट खोल असल्याने बचाव पथकांना अनेक अडचणी येत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, गाडीतील सर्व प्रवासी सप्तशृंगी देवीचे दर्शन करून परतीच्या मार्गाने खाली उतरत होते, त्या दरम्यान हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
नाशिक अपघातात पाच जणांचा मृत्यू
सप्तशृंगी गडावरून परतत असताना, गणपती पॉइंटजवळ गाडी सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती आहे. कारमध्ये एकूण सात प्रवासी होते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. मात्र, दरीची प्रचंड खोली आणि दुर्गम भाग यामुळे मदतकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
