जेएनएन, मुंबई. Pahalgam Terror Attack News: पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. तर अनेक पर्यटक हे काश्मीरच्या विविध भागात अडकले आहे. राज्यातील या पर्यटकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.
022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.
हेही वाचा - Pahalgam Terror Attack Update: मुंबईतील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष स्थापन, हेल्पलाईन नंबरही जाहीर
काश्मीरमधील संपर्क क्रमांक -
श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात 24x7 मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
- दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543
- व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397
हेही वाचा - Pahalgam Terror Attack Update: राज्यातील 6 जणांनी गमवावे आपले प्राण, गिरीश महाजन श्रीनगरसाठी रवाना