जेएनएन, मुंबई. Pahalgam Terror Attack Latest Update: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.  काल काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. यात राज्यातील 6 जणांचा समावेश आहे. तर अनेक पर्यटक हे पहलगाम भागात अडकले आहेत. यात बुलढाण्यातील 6 तर नागपुरातील 3 जणांचाही समावेश आहे.

मुंबईतील नागरिकांसाठी नियंत्रण कक्ष सुरू

मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. 

जिल्हा नियंत्रण कक्ष - मुंबई शहर हेल्पलाईन नंबर!

दुरध्वनी क्रमांक : 022-22664232 (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता)

संपर्क क्रमांक : 8657106273

    संपर्क क्रमांक : 7276446432 

    पर्यटकांसाठी आपल्कालीन  मदत कक्ष

    पर्यटकांच्या मदतीसाठी श्रीनगर येथील जिल्हा मुख्यालय, डीसी कार्यालय येथे 24x7 पर्यटकांसाठी मदत कक्ष/आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

    Contact details :

    A) 0194-2483651

         0194-2457543

    B) WhatsApp Nos.     

        7780805144

        7780938397