जेएनएन, मुंबई: दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर तपासाच्या दिशेला नवे वळण मिळाले आहे. या स्फोटाचा मुंब्रा कनेक्शन असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. “दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात काही संशयास्पद धागेदोरे महाराष्ट्रातल्या मुंब्रा परिसराशी जोडले गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एटीएसने तातडीने मुंब्रा परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्याची गरज आहे.”अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
तपास यंत्रणा योग्य दिशेने काम करत आहे, आणि तपास पूर्ण झाल्यानंतर या स्फोटामागील संपूर्ण कटकारस्थान आणि संबंधित व्यक्तींचे जाळे उघड होईल अशी माहिती शिंदे यांनी दिली.
स्फोटानंतर हालचाल
दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी देशभरातील संवेदनशील भागात सतर्कता वाढवली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही संशयितांची हालचाल महाराष्ट्रातील काही भागात दिसत आहे.यामध्ये मुंब्रा आणि ठाणे परिसरात झाल्याचे समोर आले आहे.
ATS चा तपास
खासदार शिंदे यांच्या वक्तव्यामुळे आता राज्यातील गृहमंत्रालय आणि अँटी टेररिझम स्क्वॉड (ATS) दोघांनाही अलर्ट करण्यात आले आहे.स्फोटाशी संबंधित सायबर पुरावे, मोबाईल लोकेशन्स आणि आर्थिक व्यवहार यांची छाननी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: दिल्ली स्फोटाचे पडसाद महाराष्ट्रातही; कोकण किनारपट्टीवर ‘हाय अलर्ट’, रत्नागिरीत कडक सुरक्षा व्यवस्था
