जेएनएन, मुंबई: शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला. राज्यातील 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 1892.61 कोटी रुपये निधी मंजुर निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल.

मंत्रिमंडळ सभागृह, 7 वा मजला, मंत्रालय मुंबई येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य

केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या धर्तीवर राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा उद्देश आहे. या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.  

11 हजार 130 कोटी रूपये थेट लाभ वितरीत

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतक-यांना प्रति वर्षी बारा हजार अनुदान मिळत असते. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मना योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत. आतापर्यंत सहा हप्त्यामध्ये 93 लाख 9 हजार शेतकऱ्यांना 11 हजार 130 कोटी रूपये थेट लाभ हस्तांतरणाव्दारे जमा करण्यात आला आहे.

    हेही वाचा - 8th Pay Commission लागू करण्यापूर्वी मोदी सरकार देणार गुडन्यूज; महागाई भत्त्यात होणार वाढ?

    नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना 

    जर का तुम्ही प्रधान मंत्री पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण 6000 रुपये अनुदान मिळतील.

    शेतकऱ्यांना 12000 रुपये मिळतात

    प्रधान मंत्री सम्मान निधी योजना हि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे, आता महाराष्ट्र शासनाद्वारे हि नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत सुद्धा वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. केंद्र शासनाद्वारे 6000 रुपये तसेच राज्य शासनाद्वारे 6000 एकूण 12000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

    नमो शेतकरी योजना लाभार्थी स्टेटस लिस्ट

    • Namo Shetkari Yojana Status List बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहे 
    • 1) मोबाइल नंबर 2) रेजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा उदाहरणासाठी आम्ही रेजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडला आहे. 
    • त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा. 

    namo shetkari yojana status

    • शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती आणि Fund Disbursed Details येईल यार तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या Installment ची माहिती मिळेल.

    हेही वाचा - Maharashtra Cabinet Meeting: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; 2027 पर्यंत वीज दरात मिळणार सवलत, सरकारचे 4 मोठे निर्णय