जेएनएन, मुंबई. राज्यातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात सुरूवातीचे कल हाती आले आहेत. अजित पवारांच्या शिलेदाराने बाजी मारली आहे. 

पहिला निकाल आला हाती

राज्यातला पहिला निकाल हाती लागला आहे. अजित पवारांच्या शिलेदाराने बाजी मारली आहे. वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत हा पहिला निकाल हाती आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे या निवडून आल्या आहेत. त्या नगरसेवक पदाच्या उमेदवार होत्या. अवघ्या एका मताने त्यांनी निवडणूक जिंकली आहे.

सुनीता ढोरे या प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांना एकूण 323 मतं मिळाली. त्यांनी भाजपच्या पूजा अतिश ढोरे यांना एक मताने हरवलं आहे.