जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Forecast: मुंबई आणि उपनगरांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर दुपारी/संध्याकाळ हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. IMD Mumbai ने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत दिवसा उकाडा
मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांना दिवसा उकाडा सहन करावा लागू शकतो.
संध्याकाळी हलक्या ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
IMD Mumbai ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर दुपारी/संध्याकाळ हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सून कधी व्यापणार संपूर्ण महाराष्ट्र? (Maharashtra Weather Update Today)
पुढील 4-5 दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातील इतर भागात दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईत आणि ठाण्यात उष्ण आणि दमट वातावरणाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. सध्या मान्सून महाराष्ट्रातील सोलापुरात दाखल झालेला आहे.
सविस्तर वाचा - Monsoon 2026: संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कधी येणार? मान्सून रेंगाळला… 5 दिवसांपासून एकाच ठिकाणी!
विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस
14 ते 20 जून दरम्यान छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये तुरळक ते विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. 15-16 जून दरम्यान मध्य प्रदेशात आणि 14-17 जून दरम्यान छत्तीसगड व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची (वेग ताशी 40-50 किमी, तर झोताचा वेग ताशी 60 किमी पर्यंत) शक्यता आहे.
