जेएनएन, मुंबई. Monsoon in Maharashtra: राज्यात मान्सून (Monsoon 2026) दाखल झाला आहे. आता तो खूप सावकाश पुढे सरकत आहे. त्याने कोकण व्यापला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तो संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार याची प्रतिक्षा आहे. (Maharashtra Weather Update)

एक दिवस आधी मान्सून महाराष्ट्रता दाखल

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक भागात नागरिक हे उकाड्यापासून हैराण आहेत. यंदा मान्सून एक दिवस आधी म्हणजेच 6 जून रोजी महाराष्ट्रात दाखल होऊनही पाऊस कोसळत नाही आहे. मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार, चांगला पाऊस कधी येणार याची सर्व जण प्रतिक्षा करत आहेत. 

पाच दिवसांपासून मान्सून एकाच ठिकाणी!

सध्या हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार मान्सूनचे वारे 8 जून ते 13 जून दरम्यान महाराष्ट्राच्या त्याच भागातून सतत वाहत आहेत. ते अद्याप पुढे सरकलेले नाहीत.

मान्सून सोलापुरातच!

    13 जून, 2026 रोजी, नैऋत्य मान्सूनचे वारे सध्या, हर्नई, सोलापूर, हैदराबाद, भद्राद्री कोठागुडेम, कलिंगपट्टनम, पारादीप, बारीपाडा, पुरुलिया, धनबाद, मुझफ्फरपूर भागांमधून जात आहेत. 

    पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये, ओडिशाच्या आणखी काही भागांमध्ये आणि दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांमध्ये पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे.

    कधी व्यापणार संपूर्ण महाराष्ट्र?

    पुढील 4-5 दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातील इतर भागात दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईत आणि ठाण्यात उष्ण आणि दमट वातावरणाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. सध्या मान्सून महाराष्ट्रातील सोलापुरात दाखल झालेला आहे. 

    मुंबईत उष्ण आणि दमट हवामान कायम (Mumbai Weather Update)

    हवामान विभागाने उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा तसेच तापमान आरामदायक पातळीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची, तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

    विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस

    14 ते 20 जून दरम्यान छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये तुरळक ते विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. 15-16 जून दरम्यान मध्य प्रदेशात आणि 14-17 जून दरम्यान छत्तीसगड व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची (वेग ताशी 40-50 किमी, तर झोताचा वेग ताशी 60 किमी पर्यंत) शक्यता आहे.