जेएनएन, मुंबई: मुंबई महानगरातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महापालिकेने दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी 14 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत तब्बल 22 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय (Mumbai Water Supply Cut) घेतला आहे. या कालावधीत घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, वडाळा, सायन आणि माटुंगा या विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा यंत्रणेमधील मुख्य जलवाहिन्यांवर देखभाल आणि दुरुस्तीची महत्त्वाची कामे हाती घेण्यात येत आहेत. या कामांदरम्यान पाणीपुरवठा बंद ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्या भागात होणार परिणाम 

  • पूर्व उपनगर- घाटकोपर, कुर्ला, चेंबूर
  • मध्य मुंबई- सायन, वडाळा, माटुंगा

या सर्व भागांतील नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

पाणी बंदीची वेळ - 

  • 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 
  • 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत

या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहील, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांत पाणी दाब कमी असू शकतो असेही सांगण्यात आले आहे. 

    नागरिकांना सूचना- 

    • आवश्यकतेनुसार पिण्याचे व वापराचे पाणी आधीच साठवून ठेवावे.
    • पाण्याचा अविचाराने वापर टाळावा.
    • पाण्याचा दाब कमी झाल्यानंतर मोटरचा वापर टाळण्याचेही आवाहन महापालिकेने केले आहे.

    हेही वाचा - Vande Bharat: पुण्याला पुन्हा एक मिळणार वंदे भारत; ‘या’ जिल्ह्यांला जोडणार, अशी असेल स्थानके