मुंबई. Mumbai Water Cut: शहरातील अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये शुक्रवारी 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महत्त्वाच्या जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे घेण्यात आला आहे.नियोजित शटडाऊननुसार पाणीपुरवठा शुक्रवार सकाळी 9 वाजेपासून पुढील दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
कोणते विभाग होणार प्रभावित?
महापालिकेच्या माहितीनुसार खालील विभागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
• F साऊथ विभाग : परळ, शिवडी परिसर
• F नॉर्थ विभाग : दादर, माटुंगा, सायन
• L विभाग : कुर्ला परिसर
• M ईस्ट विभाग : गोवंडी, मानखुर्द
• M वेस्ट विभाग : चेंबूर परिसर या भागात पूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार असून काही विभागांमध्ये पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता आहे.
पाणीकपात कशासाठी?
महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामागे —
• जुन्या पाईपलाइनची दुरुस्ती
• काही प्रमुख जलवाहिनींची बदल-घडामोड
• गळती व तांत्रिक अडचणी दूर करण्याची कामे कारणासाठी ही कारणे दिली आहेत. पाणीपुरवठा व्यवस्थित आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे BMC ने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना आवाहन
BMC ने नागरिकांना शटडाऊनपूर्वी पुरेसा पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. पाणी काटकसरीने वापरण्याचे,अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.पाणीपुरवठा शनिवारी सकाळपासून टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल, असेही महापालिकेने सांगितले आहे.
