एजन्सी, मुंबई. Newly Wed Woman Suicide Case: मुंबईतील सांताक्रूझ पूर्व येथे लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यांत एका 29 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. नेहा मिश्रा असे मृत महिलेचे नाव असून, तिने रविवारी रात्री कलिना येथील शास्त्री नगरमधील माहेरी गळफास लावून घेतला.
2 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
"तिचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ती तिच्या आईच्या घरी राहत होती. तिची आई जवळच्या मंदिरात गेली असताना तिने जीवन संपवले. जेव्हा तिची आई घरी परतली, तेव्हा तिची मुलगी छताच्या पंख्याला लटकलेली दिसली," असे वाकोला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सुसाईड नोट सापडलेली नाही
घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, असे त्यांनी सांगितले. अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. आत्महत्या कोणत्या कारणाने केली यांचा अद्याप खुलासा झालेल्या नाही. पोलिस प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत.