एजन्सी, मुंबई. Badlapur Accused Dies in Custody Case: बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र सरकारला पाच पोलिसांविरुद्ध FIR (प्रथम माहिती अहवाल) दाखल करण्याचे आदेश दिले. या पोलिसांना कोठडीतील मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तांना या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास सरकारने दाखवलेल्या "उदासीनतेबद्दल" खंडपीठाने सरकारला फटकारले आणि म्हटले की, अशा कृतीमुळे राज्याच्या कायदेशीरतेवर आणि सामान्य माणसाच्या गुन्हेगारी न्यायव्यवस्थेवरील विश्वासावर परिणाम होतो. "दंडाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या पडताळणीनंतर, आम्ही समाधानी आहोत की (शिंदेचा) कोठडीतील मृत्यूची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, कारण पोलिसांच्या गोळीबारात तो बळी पडला," असे न्यायालयाने म्हटले.
"न्याय केवळ झाला नाही, तर तो होताना दिसला पाहिजे, एसआयटी या कटाचा पर्दाफाश करेल, अशी आम्हाला आशा आहे," असे खंडपीठाने म्हटले. पोलिसांनी कायद्याच्या तरतुदींचे पालन करणे आणि जेव्हा प्रथमदर्शनी गुन्हा उघड होतो, तेव्हा तपास करणे आणि तो तार्किक निष्कर्षापर्यंत नेणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
कोर्टाने गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तांना पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. सरकारी वकील अमित देसाई यांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
हेही वाचा - Maharashtra Crime News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर डॉक्टरकडून अत्याचार, जीवंत मारण्याची दिली धमकी, अटक
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे, 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा तुरुंगातून कल्याणला नेत असताना पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला, असा आरोप आहे. दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात पाच पोलिसांना दोषी ठरवण्यात आले होते आणि कोठडीतील मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरण्यात आले होते. शिंदेच्या पालकांनी केलेला बनावट चकमकीचा दावा योग्य असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, हवालदार अभिजीत मोरे आणि हरिश तावडे आणि पोलिस चालक सतीश खाटल यांचा समावेश आहे.