जेएनएन, मुंबई Maharashtra Weather Update: मध्य भारतावर एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरासह राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागात 20 ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पावसाचा जोर ओसरणार

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत 20 तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल, परंतु काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

19 तारखेच्या तुलनेत 20 तारखेला मुंबई शहरासह मुंबई महानगरातील इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. मात्र 20 तारखेच्या दुपार पर्यंत काही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे, आणि त्यानंतर पाऊस अजून ओसरेल.

20 तारखेला सर्वात अधिक पाऊस पालघर जिल्हा (प्रामुख्याने उत्तर भाग) आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात पडण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र 20 ऑगस्ट पासूनच पावसाचा जोर ओसरेल.

कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट

    • ऑरेंज अलर्ट -
      पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, 
    • रेड अलर्ट -
      ठाणे, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट,  
    • येलो अलर्ट -
      सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

    हेही वाचा - Mumbai Rains Live Updates: मुंबईत वादळीवाऱ्यासह अतिजोरदार पाऊस