जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Update: मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपले आहे. बेलापुरमधील पाणी अद्यापही ओसरलं नाही, बेलापूर सेक्टर 3 आणि 4 मध्ये पाणीच पाणी झाले. पाण्यामध्ये अनेक वाहन पडली बंद आहे तर पाण्यामध्ये बस देखील अडकली, पाण्यातमध्ये नवी मुंबई पालिकेची बस अडकल्याने प्रवाशी चालत निघाले आहेत. मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला मोठा फटका बसला आहे. आचार्च अत्रे चौक वरळी स्थानकात पाणीच पाणी झाले आहे. 

वाशी प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये सीमा भिंत कोसळली

नवी मुंबईतील वाशी प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये मुसळधार पावसात रस्त्याचा काही भाग खचला. मुसळधार पावसामुळे सीमा भिंत कोसळली, ज्यामुळे पार्क केलेल्या अनेक दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, सीवरेज लाइन आणि बागेच्या क्षेत्रावरही परिणाम झाला आहे.

विक्रोळीत तीन तरुणांच्या अंगावर झाड कोसळले; एकाचा मृत्यू

विक्रोळी कन्नमवार नगर येथील गणेश मैदानात  एक मोठे झाड तीन तरुणांच्या अंगावर कोसळले. यात तेजस नायडू वय वर्ष 25 या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यातील दोघे सुखरूप असून, घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले व या झाडाला कापून आता साईडला करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

    मात्र, स्थानिक नागरिकांनी या घटनेला महानगर पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे. कारण हे झाड मुळासकट पडले नसून जी बाजू खराब झाली होती. त्या ठिकाणावरून हे झाड खाली कोसळले आहे. त्यामुळे यात मयत झालेल्या तरुणाला मदत करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

    मुंबई विमानतळ परिसरात पाणी भरायला सुरुवात 

    मुंबई उपनगरमध्ये जोरदार पाऊस पडल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. रनवे जवळ पाणी साचल्यास विमान वाहतूक सेवाच्या उद्यानवर प्रभाव पडू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.