जेएनएन, मुंबई. Mumbai Rain alert: मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही अनेक भागात संततधार पाऊस झाला आहे. यातच आता हवामान विभागानं उद्या ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

बीएमसीकडून आवाहन

भारतीय हवामान खात्याकडून उद्या, 17 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईत पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या 1916 किंवा 022-22694725 / 27 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन बीएमसीकडून करण्यात आलं आहे.

मुंबईत संततधार पाऊस

सोमवारी सकाळी मुंबईत संततधार पाऊस कोसळला, ज्यामुळे सखल भागात पाणी साचले आणि रस्ते वाहतूक, उपनगरीय गाड्या आणि मेट्रो रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बीएमसी अधिकाऱ्यांच्या मते, 24 तासांत मुंबई शहरात सरासरी 95 मिमी पाऊस पडला, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनुक्रमे 58 आणि 75 मिमी पाऊस पडला.

हेही वाचा - Mumbai Rains: मुंबईत संततधार पाऊस; लोकल ट्रेन, मेट्रो सेवा प्रभावित

    रायगडला रेड अलर्ट

    हवामान विभागाने आज कोकणात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड जिल्ह्याला हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्टही दिला आहे.