जेएनएन, मुंबई. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत (mumbai rains today) आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाकडून आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज येलो अलर्ट (Rain Aalert in Mumbai) देण्यात आला आहे.

आज म्हणजेच 23 जुलै कोकण किनारपट्टीवर मुंबई ठाणेसह अनेक ठिकाणी पुढील 3-4 तासांत अधूनमधून ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, जसे की नवीनतम उपग्रह निरीक्षणात दिसून आले आहे. घाट भागात लक्ष ठेवले जाईल. दक्षिण विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत पुढील 2-3 तासांत हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 

मुंबईत संततधार 

मुंबईत सध्या पावसाचा संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. याचा वाहतूकीवर परिणाम झाला आहे. सखल भागात पाणी भरल्यामुळे वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे.

मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता

मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, अधूनमधून 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

    या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

    राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

    या जिल्ह्यांना येलो अलर्ट

    पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.