जेएनएन, मुंबई. Mumbai Rains Latest News: भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात आज सकाळी मोठी घटना घडली आहे. येथील एका इमारतीच्या मागील बाजूस असलेली संरक्षण भिंत कोसळली. या घटनेमुळे काही घरांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

घटना घडल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

या भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने संरक्षण भिंत कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या प्रशासनाकडून नुकसानाचा तपशील आणि पुढील उपाययोजना यावर काम सुरू आहे.

तसंच, कसारा स्थानकावर मंगळवारी रात्री आलेल्या उपनगरीय ट्रेनच्या डब्यात भूस्खलनाचा (Landslide near Kasara Station) ढिगारा घुसल्याने एक पुरुष प्रवासी जखमी झाला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या (सीआर) अधिकाऱ्याने दिली.  कसारा स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर रात्री 9.15 वाजता लोकल ट्रेन प्रवेश करत असताना ही घटना घडली.

मुंबईत संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी उशिर होत आहे.