जेएनएन, मुंबई. Maratha Andolan : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांनंतर मुंबई पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात पोलिसांनी सुरक्षेचा  वेढा घातला आहे.

मराठा आंदोलनामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होऊ नये,यासाठी उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. जे जे उड्डाणपूल (JJ Flyover) तसेच मुंबई महानगरपालिकेसमोरील रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत. आंदोलकांना केवळ भूयारी मार्गाचा (Subway) वापर करण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांची कारवाई-

न्यायालयाच्या आदेशनंतर तातडीने जे जे उड्डाणपूल व BMC मुख्यालयासमोरील रस्ता रिकामा करण्यात आला आहे. CSMT स्टेशन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक आणि गुप्तहेर युनिट कार्यरत आहे.

आंदोलकांवर निर्बंध -

आंदोलकांना जमावबंदीचे उल्लंघन करता येणार नाही, याची काटेकोर खबरदारी घेतली जात आहे. केवळ ठरवून दिलेल्या मार्गावरून व भूयारी मार्गाचा वापर करूनच ये-जा करण्याची अट घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून सिग्नल नियंत्रण व पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.