मुंबई. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाकडून छापेमारी केली जात असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा धडाका सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एफीडएकडून अनेक हॉटेल व आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत काही पदार्थात मेलेलं झुरळ आढळल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर एफडीएने संबंधित हॉटेल सील देखील केले होते. आता मुंबईतील बोरिवलीतून असाच एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. आता चक्क मसाला डोशात मेलेला उंदीर आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर हॉटेल मालकाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एका रेस्टोरंटमध्ये मसाला डोशात मेलेला उंदीर आढळून आला. गिऱ्हाईकाने याची तक्रार तत्काळ बोरीवली पोलीस ठाण्यात केली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक रेस्टोरंटच्या मालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
@Tukaram_IndIAS @Dev_Fadnavis @mieknathshinde @RajThackeray
— Umesh Dubey (@umesh_dube59460) September 24, 2026
Hotel : Radhakrishnan hotel
Address: 101 Sun Plaza Lokmanya Tilak Road Opposite Diamond Talkies, Mhatre Wadi, Borivali West, Mumbai, Maharashtra 400092
Boiled Rat in Masala Dosa
Date : 24/09/2026
Time : around 10 pic.twitter.com/Z6xGfdwVK1
मसाला डोशात आढळला मेलेला उंदीर -
गिऱ्हाईकाने रेस्टोरंटमध्ये खाण्यासाठी म्हैसूर मसाला डोसा ऑर्डर केला होता. गिऱ्हाईकाच्या भावाने एक दौन घास खाल्यानंतर त्याला आतमध्ये मेलेला उंदीर दिसला.
डोश्याच्या आतमध्ये मेलेला उंदीर पाहून त्याने तत्काळ उलटी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये डोश्याच्या आतमध्ये मेलेला उंदीर स्पष्टपणे दिसून येतो. गिऱ्हाईकाने रेस्टोरंटविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
