जेएनएन, मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी ते शिवडी यादरम्यान नव्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची घोषणा आहे. हा प्रकल्प आगामी काही वर्षांत मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची तसेच मध्य मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
युथ कनेक्टिव्हिटी कार्यक्रमांतर्गत उभारणी
सरकारच्या महत्त्वाच्या ‘युथ कनेक्टिव्हिटी’ कार्यक्रमांतर्गत या उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार असून, हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत विकासातील एक मोठी झेप मानली जात आहे. पुढील पाच ते सात वर्षांत मुंबईचा सर्वांगीण विकास झपाट्याने होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
या उड्डाणपुलाचे प्रमुख फायदे !
- मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल
- प्रवाशांचा वेळ वाचेल; पूर्व–पश्चिम जोडणी अधिक वेगवान होणार
- मुंबईत मोठ्या टनेल कनेक्शन आणि एसी लोकलसारख्या आधुनिक सोयींना पूरक सुविधा
- शहरातील अंतर्गत भागांना अधिक सहज व जलद कनेक्टिव्हिटी
प्रवास अधिक सुकर
वरळी–शिवडी कनेक्शनमुळे ईस्टर्न फ्रीवे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, तसेच कोस्टल रोड यांना जोडणी अधिक बळ मिळणार आहे. नव्या उड्डाणपुलामुळे या सर्व मार्गांची वाहतूक क्षमता वाढणार असून मुंबईच्या दोन्ही काठांवरील प्रवास अधिक सुकर होणार आहे.
आराखडा लवकरच अंतिम होणार
या प्रकल्पाचा आराखडा लवकरच अंतिम करण्यात येणार आहे. निधी, तांत्रिक बाबी आणि कामाची वेळापत्रक याबाबत लवकरच तपशील जाहीर होईल. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनंतर मुंबईतील पायाभूत विकासाला नव्या वेगाची चाहूल लागली आहे. मुंबईकरांसाठी हा उड्डाणपुल भविष्यातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुसाट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
