जेएनएन, मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला थेट, जलद आणि वाहतूककोंडीमुक्त जोडणाऱ्या मेट्रो लाईन 8 (Mumbai Metro 8) प्रकल्पाला गती मिळाली आहे. मानखुर्द ते पनवेल असा सुमारे 22 ते 24 किलोमीटर लांबीचा हा मार्ग निश्चित करण्यात आला असून, या मार्गावर एकूण 11 स्थानकांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. मंजुरीनंतर मुंबई–नवी मुंबई प्रवास अल्पावधीत आणि सोयीस्कर होणार आहे.

प्रस्तावित Metro-8 मार्ग

मेट्रो लाईन 8 ही मानखुर्दपासून पनवेलपर्यंत धावणार असून यामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरांना आणि नवी मुंबईला मोठा लाभ होणार आहे.  

प्रस्तावित 11 स्थानकांची यादी ! 

  1. मानखुर्द 
  2. गोवंडी
  3. एमआयडीसी – TTC उद्योगक्षेत्र
  4. खांदा कॉलनी
  5. कामोठे
  6. कलंबोली
  7. पनवेल बस डेपो
  8. पनवेल स्टेशन पूर्व
  9. पनवेल टर्मिनसजवळील इंटरचेंज
  10. स्मार्ट सिटी झोन
  11. नवीन पनवेल टर्मिनल (संपर्क बिंदू)

प्रकल्पाची वैशिष्ट्ये!

  • संपूर्ण मार्ग उच्चस्तरीय (Elevated) असणार आहे. 
  • प्रवासाचा वेळ सध्या 60 ते 90 मिनिटे लागत असताना, Metro-8 सुरू झाल्यावर केवळ 25–30 मिनिटांत पनवेल–मानखुर्द प्रवास शक्य होणार आहे. 
  • सीमेवरील वाहनतळ, शहरात वाढणारी वाहतूक आणि Sion–Panvel महामार्गावरील गर्दी यावर मोठा ताण कमी होणार. 
  • मुंबई मेट्रो लाइन्स 2, 4 आणि 11 सोबत जोडणी मिळाल्याने प्रवास अधिक सुलभ होईल.

हेही वाचा - Sampada Munde Suicide Case: महिला डॉक्टरांची फसवणूक आणि शोषण; हातावर नोट कोणी केली? फडणवीसांनी सभागृहात दिली माहिती