जेएनएन, मुंबई. Mumbai Local Mega Block Today: मध्य रेल्वेने आज आणि रविवारी विशेष ट्रॅफिक मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. कर्जत रेल्वे यार्ड सुधारणेच्या कामांसाठी कर्जत रेल्वे स्थानकातील पोर्टल्स काढून टाकण्यासाठी मध्य रेल्वेने शुक्रवारी आणि रविवारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे.

या मेघाब्लॉकमुळे अनेक लोकल रेल्वे सेवा रद्द होणार आहेत. अनेक लोकलच्या वेळात बदल तसेच रूट ही बदल करण्यात येणार आहे. पळसधरी ते भिवपुरी रोड या दरम्यान अप आणि डाउन मार्गावर शुक्रवारी दुपारी 1.50 ते दुपारी 3.35 आणि रविवारी स. 11.20 ते दुपारी 13.05 दरम्यान ब्लॉक असणार आहे. या मार्गावरील सर्व लोकल आणि मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. या मार्गावर प्रवास करत असतां प्रवाशांनी वेळापत्रक वाचूनच घरा बाहेर पडावे (Mumbai local train mega block details).

असा असणार आहे मेघाब्लॉक 

आज 17 जानेवारी 

स्थानक - पळसधरी ते भिवपुरी रोड

    मार्ग - अप आणि डाउन

    वेळ - दुपारी 1.50 ते दुपारी 3.35 पर्यंत

    बदलापूर ते खोपोलीदरम्यान लोकल सेवा बंद असणार आहेत. दुपारी 12.20 वाजताची सीएसएमटी- खोपोली आणि दुपारी 1.19 वाजताची सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकात रद्द करण्यात येणार आहे. 1.40 वाजताची सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूरमध्ये थांबवण्यात येणार आहे. 

    दुपारी 1.55 वाजताची कर्जत-सीएसएमटी आणि 1.48 वाजताची खोपोली-सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकवरून रवाना करण्यात येणार आहे. कर्जत येथून 3.26 वाजताची सुटणारी सीएसएमटी लोकल बदलापूर स्थानकावरून सुटणार आहे.

    रविवार, 19 जानेवारी रोजी.

    स्थानक - पळसधरी ते भिवपुरी रोड

    मार्ग - अप आणि डाउन

    वेळ - सकाळी 11.20 ते दुपारी 1.05

    या ब्लॉकच्या वेळेत नेरळ आणि खोपोली दरम्यान लोकल रद्द राहणार आहे. सकाळी 9.27 आणि 11.14 वाजताची सीएसएमटी-कर्जत लोकल नेरळ स्थानकात थांबणार आहे. सकाळी 11.19 ते दुपारी 1 दरम्यान सुटणाऱ्या लोकल नेरळ स्थानकातून धावणार आहे. गाडी क्र.11014 कोईम्बतूर- एलटीटी लोणावळ्यात थांबवण्यात येणार आहे. गाडी क्र. 12493 पुणे-हजरत निजामुद्दीन गाडी क्र.12164 चेन्नई- एलटीटी पुणे विभागात थांबणार आहे.