जेएनएन, मुंबई. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस सज्ज आहे, असं नवी मुंबई पोलिस उपयुक्त पंकज डहाणे यांनी सांगितलं आहे. यंदा नियमांचे उल्लंघन करून होळी साजरी करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. नशाकरून वाहन चालवल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. नवी मुंबईत पाचशेहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत, असं त्यांनी म्हटलं.

सार्वजनिक ठिकाणी रंगीत पाणी शिंपडणे तसेच अश्लील बोलणे यामुळे काही वेळा जातीय तणाव निर्माण होतो. तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते, मात्र, त्यावर आमची नजर असेल असं मुंबई पोलिसांनी (Mumbai Police News) म्हटलं आहे.

अफवांना बळी पडू नये

आनंदाने होळी सण साजरा करावा, कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये, असं आवाहन नवी मुंबई पोलिस उपयुक्त पंकज डहाणे यांनी केल आहे. तर डीव्हाय पाटील स्टेडिअममध्ये अमेरिकन सिंगर मार्टिन गॅरिक्स चा कार्यक्रम होत आहे, त्या अनुषंगाने सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

    मुंबईत 11 हजार पोलिसांचा फौजफाटा

    होळी (Holi 2025) आणि धुलीवंदनाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी 11 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच 07 अप्पर पोलीस आयुक्त, 19 पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 1767 पोलीस अधिकारी, 9145 पोलीस अंमलदार, एसआरपीएफच्या तुकड्या ,शीघ्र कृती दलाची पथके, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आणि होमगार्ड जवानही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.