Mumbai Ganeshotsav 2025 : गणेश चतुर्थी जवळ येताच हवेत उत्साह संचारला जातो व संपूर्ण मुंबानगरी  भक्ती आणि उत्साहाच्या सागरात बुडून जाते. गेल्या तीन चार दिवसापासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गणेश भक्तांना थोडं निराश केलं होते. मात्र त्यांच्या उत्साहावर या पावसाचा व रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा काहीच परिणाम झाला आहे. आकाशातून पावसाची संततधार सुरू असताना गणपती बप्पांच्या मूर्ती परळच्या कार्यशाळेतून शहरातील विविध मंडळांच्या पंडालांमध्ये पोहोचत आहेत. रविवारी अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते व भाविक आप-आपल्या गणेश मंडळाच्या मूर्ती पंडालापर्यंत नेताना दिसत होते.

मुंबईतील गणेश मूर्ती तयार करण्याचे मुख्य केंद्र परळची कार्यशाळा आहे. येथे गणेश भक्तांची गर्दी वाढताना दिसत आहे. येथून प्रतिवर्षी हजारो गणेश मूर्ती मुंबई आणि उपनगरांमधील विविध गणेश मंडळांच्या मंडपात विराजमान होत असतात. यंदा पावसाने थैमान घातले असतानाही भक्तांच्या चेहऱ्यावरील आस्था व उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. 

मोठ-मोठे ट्र्क आणि हातगाड्यांवर लादून रंग-बेरंगी फुलांनी व रंगांनी सजलेल्या गणेशमूर्ती परळहून रवाना होत आहेत. मूर्ती आपल्या मंडळाकडे नेत असताना"गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!" च्या घोषणांना परिसर दणाणून गेला आहे.

सध्या मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मूर्ती मंडपापर्यंत नेताना भक्तांना तारेवरची करसत करावी लागत आहे. इतक्या अडचणी येत असतानाही भक्ताचा उत्साह आणि गणेशाप्रती भक्ती कमी होताना दिसत नाही. ढोल-ताशे, बँजोच्या तालावर नाचत गोविंदा पथकांनी भक्तांचा उत्साह आणखी वाढवला. 

27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या व पुढील 10 दिवस चालणाऱ्या या उत्सावादरम्यान देश-विदेशातील लाखो भक्त गणपती बप्पाच्या दर्शनासाठी मंडपात येतील. पर्यावरणाचा मुद्दा लक्षात घेऊन अनेक सार्वजनिक मंडळांनी यंदा इको-फ्रेंडली मूर्ती बनवल्या आहेत. जेणेकरून विसर्जनाच्या वेळी समुद्र प्रदूषण रोखले जाईले. मुंबईसाठी गणेशोत्सव केवळ एक धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.

पावसाने भलेही मुंबईचा वेग कमी केला आहे मात्र लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताला मुंबईकरांची आस्था आणि उत्साह सतत वाढत आहे.