जेएनएन, मुंबई. राज्यात मान्सून 8 जून रोजी दाखल झाला होता. त्यानंतर दोन दिवस चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर मान्सूनने दांडी मारली ती आजपर्यंत. आता मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यात अनेक भागात रिमझिम तर कुठे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
मान्सून मुंबईत दाखल
मुंबईसह कोकणात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज सकाळी अनेक भागात रिमझिम पाऊस सुरु आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना काहीसा गारवा चाणवला. आणि अडकळीला पडलेल्या छत्र्या आणि रेनकोट बाहेर काढावे लागले.
#WATCH | Maharashtra | Monsoon 2026 arrives in Mumbai. IMD has issued a yellow alert in the city, also forecasting "thunderstorm and lightning."
— ANI (@ANI) June 22, 2026
Visuals from Bandra East pic.twitter.com/dXgStAo3Pm
पुण्यातही रिमझिम पाऊस
पुण्यातही अनेक भागात जोरदार तर कुठे हलका-फुलका पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. अनेक भागात पाणी संकट आहे. येत्या काळात चांगल्या पावसाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. एनडीए पुणे, भोर, शिवाजीनगर, पाशान, लवाळे परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.
