जेएनएन, मुंबई. Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे की ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या काही दिवसात हा पक्षप्रवेश होऊ शकतो. काल आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता.
शिंदेसेनेत जाण्याचा घेतला निर्णय
मागील अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार शिंदे गटात जाणार होते. यात आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी सायंकाळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून शिंदेसेनेत जाण्याचा त्यांचा निर्णय जाहीर केला.
कार्यकर्त्यांशी साधला संवाद
ओमराजे निंबाळकर हे पुण्यातून निघाल्यानंतर रविवारी दुपारी 4 वाजता त्यांच्या गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी पोहोचले. त्यांनी वडील स्व. पवनराजे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर 5 वाजेपासून बैठका सुरु केल्या. मतदारसंघातील औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, बार्शी, परंडा या सहाही विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर रात्री त्यांनी आपल्या निर्णय जाहीर केला.
मतदारसंघातील स्थिती आणि कार्यकर्त्यांनी मागणी लक्षात घेऊन आपण पक्षांतर करत असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केले.
