जेएनएन, मुंबई. Monsoon in Maharashtra: राज्यात मान्सून (Monsoon 2026) दाखल झाला आहे. आता तो खूप सावकाश पुढे सरकत आहे. त्याने कोकण व्यापला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तो संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार याची प्रतिक्षा आहे. (Maharashtra Weather Update)
मान्सून महाराष्ट्रात दाखल, कोकण व्यापला
12 जून, 2026 रोजी, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण वायव्य बंगालच्या उपसागरात, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये, पश्चिम बंगाल व बिहारमध्ये आणि ओडिशा व झारखंडच्या काही भागांमध्ये आणखी प्रगती केली आहे.
पुढील दोन दिवस महत्त्वाचे
पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती असून, ते मध्य अरबी समुद्राचा काही भाग, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व पश्चिम-मध्य बंगालचा उपसागर, ओडिशा, झारखंड व बिहारचा काही भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये प्रवेश करतील.
कधी व्यापणार संपूर्ण महाराष्ट्र?
पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातील इतर भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि कोकणवासीयांसाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे आहेत. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सध्या मान्सून महाराष्ट्रातील सोलापुरात दाखल झालेला आहे.

हेही वाचा - Weather Update: जूनच्या शेवटच्या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस; नंतर मान्सून घेणार ब्रेक!
मुंबईत हलक्या पावसाची शक्यता (Mumbai Weather Update)
भारतीय हवामान विभागाने (IMD) 13 जून रोजी मुंबई आणि ठाण्यात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तसेच महाराष्ट्राच्या काही भागांत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे. तर काही ठिकाणी वादळी वारे आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
