जेएनएन, मुंबई. Monsoon in India: राज्याच्या सीमेवर मान्सून (Monsoon 2026) दाखल झाला आहे. आता तो पुढे सरकला आहे. त्याने कोकण व्यापला आहे. आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. (Maharashtra Weather Update)

मान्सून महाराष्ट्रात दाखल, कोकण व्यापला

आज, 8 जून, 2026 रोजी, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तसेच तेलंगणाच्या काही भागांमध्ये आणखी प्रगती केली आहे. 

पुढील दोन दिवस महत्त्वाचे

पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती असून, हे वारे मध्य अरबी समुद्राचा काही भाग, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा उर्वरित भाग व नैऋत्य बंगालचा उपसागर, पश्चिम-मध्य आणि वायव्य बंगालचा उपसागराचा काही भाग, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल व सिक्कीमचा काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागांमध्ये पसरतील.

कधी व्यापणार संपूर्ण महाराष्ट्र?

    पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातील इतर भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि कोकणवासीयांसाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे आहेत. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

    मुंबईत हलक्या पावसाची शक्यता (Mumbai Weather Update)

    भारतीय हवामान विभागाने (IMD) 11 जूनपर्यंत मुंबई आणि ठाण्यात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तसेच महाराष्ट्राच्या काही भागांत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे.