जेएनएन, मुंबई. Maratha Reservation Protest : ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्याचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी जमली असून आंदोलक सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर उतरले आहे. काहीनी गार्ड केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत लोकलच्या काचेवर मराठा आरक्षणाचे पोस्टर्स चिटकवले. यामुळे लोकल रेल्वे विस्कळीत झाली आहे. 

पोलीस आंदोलकांना ट्रॅकवरुन हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाला राज्य सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आजपासून आंदोलन आणखी आक्रमक झाले आहे. 

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करत.विकेंड आणि गणपती सुट्टीमुळे या आंदोलनाचा सर्वसामान्य मुंबईकरांवर मोठा परिणाम झाला नाही. मात्र आज सोमवारी कामकाजाचा दिवस असल्याने परिस्थिती चिघळली आहे.

रेलरोको आंदोलन-

मराठा समाजाच्या आंदोलकांनी मुंबईतील काही महत्त्वाच्या स्थानकांवर रेलरोको केले आहे तर काही ठिकाणी स्थानकच्या ट्रकवर आंदोलक उतरले आहे.सीएसएमटी स्थानकवर आंदोलक ट्रकवर उतरले आहे. यामुळे लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. याचा मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. कामकाजाचा दिवस असल्याने   लाखो प्रवाशी कार्यालयात उशिरा पोहोचत आहेत.

    मागील तीन दिवसांपासून मराठा आंदोलकांनी रेल्वे स्टेशनचा आश्रय घेतला असून रात्रीचा मुक्कामही रेल्वेच्या फलाटावरच केला जात आहे. आंदोलकांनी संपूर्ण स्टेशन व्यापले असून सर्वत्र गर्दी झाली आहे. त्याचबरोबर आंदोलकांकडून महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन केल्याचे आरोप केले जात आहेत.