जेएनएन, मुंबई. Manoj Jarange Patil : मराठ्यांना ओबीसी कोट्यातून 10 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम अजून सरकारकडून त्यांच्याशी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. दरम्यान मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन आक्रमक झाले आहे. आजपासून (सोमवार) मनोज जरांगे पाटील यांनी पाणी त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.
डॉक्टरची टीम सज्ज -
मनोज जरांगे पाटल यांना जास्त प्रमाणात पाणी पिण्यास व ORS घेण्यास सांगितले होते. डॉक्टरची टीम पाटील यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे. दरम्यान पाटील यांनी आजपासून पाणी त्याग करण्याची घोषणा केल्याने सरकारवर दबाव वाढला असून सरकारी पातळीवर हालचाली वाढल्या आहेत.
कशी आहे जरांगे यांची प्रकृती?
सध्या मनोज जरांगे पाटील यांची शुगरची पातळी 70 च्या आसपास आहे, जी चिंताजनक मानली जात आहे. पाणी न घेतल्यास प्रकृती झपाट्याने खालावण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, आम्ही लवकरच आंदोलकांकडे अंतिम प्रस्ताव घेऊन जाऊ. रविवारी आंदोलकांसोबत चर्चा झाली नसली तरी चर्चेची दारे उघडी असल्याचे सरकारने म्हटले आहे.
हे ही वाचा - अंघोळ, जेवण, नाच-गाणे… मराठा आंदोलकांनी मुंबईच्या 'हेरिटेज झोन'ला बनवले छावणी