जेएनएन, नागपूर: महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नागपूर येथे भरते. मात्र, यंदा राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमुळे अधिवेशन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. प्रशासकीय यंत्रणा निवडणुकांमध्ये गुंतलेली असल्याने या अधिवेशनाचे वेळापत्रक किमान 10 दिवसांनी पुढे ढकलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय कामकाजाची व्यस्तता
माहितीनुसार, सुरुवातीला हे अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू करण्याचा प्रस्ताव होता. परंतु, निवडणुकांची मतमोजणी, निकालानंतरच्या प्रशासकीय कामकाजाची व्यस्तता आणि नव्या प्रतिनिधींच्या शपथविधीच्या तारखा लक्षात घेता, आता अधिवेशन 18 ते 20 डिसेंबरदरम्यान (Maharashtra Winter Session Date) सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चर्चेनंतर निर्णय
राज्य शासन आणि विधानसभा सचिवालय यांच्यात याबाबत चर्चा सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा आणि विधान परिषद अध्यक्ष सहित विधिमंडळ कामकाज समिति सोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल,, अशी माहिती आहे.
हिवाळी अधिवेशन 18 ते 20 डिसेंबर पासून होण्याची शक्यता
पावसाळी अधिवेशात विधानसभा अध्यक्षांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 8 डिसेंबर पासून होणार असल्याची घोषणा विधानसभामध्ये केली होती. यामुळे विधिमंडळचा हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 8 डिसेंबर पासून अपेक्षित होते मात्र हे अधिवेशन 18 ते 20 डिसेंबर पासून होण्याची शक्यता आहे.
