जेएनएन, मुंबई. (Maharashtra Winter Session 2025): राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज संपले आहे. या अधिवेशन एकूण 15 बैठका झाल्या आणि अधिवेशनात एकुण 133 तास 48 मिनिचे काम काज झाले, तर  फक्त 45 मिनिटे वेळ वाया गेला, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. आता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2025) हे सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी नागपुरात होणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना हिवाळी अधिवेशनाच्या तारखेबद्दलचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही यावेळी नार्वेकर यांनी सांगितलं. तसंच, राज्यपालांनी दिलेल्या संदेशानुसार पावसाळी अधिवेशन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राहुल नार्वेकर यांनी केली.

अधिवेशनात झालेले कामकाज -

  • एकूण बैठका - 15
  • एकूण कामाचा वेळ, 133 तास 48
  • वाया गेलेले वेळ - 45 मिनिटे 
  • दिवसाचे सरासरी कामकाज - 8 तास 55

  • अभिनंदन प्रस्ताव - 1
  • शोक प्रस्ताव - 7

    • तारांकित प्रश्न - 8277 
    • स्विकृत प्रश्न - 579
    • उत्तरित झालेले प्रश्न - 92 
    • प्राप्त सूचना -8 
    • अस्विकृत सूचना - 8
    • चर्चा - 7

    • सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना - 181
    • मान्य सूचना - 42
    • चर्चा झाली - 5 

    • विधानसभेत सादर झालेली शासकीय विधेयके - 14
    • संहमत - 15 
    • मागे घेण्यात आलेले - 1

    • आमदारांनी मांडलेल्या प्राप्त लक्षवेधी सूचना - 2481 
    • स्विकृत सूचना - 511 
    • चर्चा झालेल्या सूचना - 152