जेएनएन, मुंबई. राज्यात अनेक जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा अंदाज (Weather Update Today Maharashtra) वर्तवला आहे. मात्र, मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ही जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील हवामानाची स्थिती

राज्यात मागील काही दिवसांत तापमानात काही अंशांची घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. फळबागा आणि आंबा पिकांचे या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. 

आज या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट (Yellow Alert in Maharashtra)

राज्यात तापमानात घट झाली असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसांचा अलर्ट देण्यात आलेला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   

या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट वातावरणाचा येलो अलर्ट

    पालघर, मुंबई जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरणाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.  

    मुंबईत पुढील पुढील 24 तासांसाठी अलर्ट (Mumbai Weather Update)

    पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

    11 मे रोजी या जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट (11 May Weather Update in Maharashtra)

    रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आहे.