जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च-एप्रिल महिन्यांचा हप्ता अद्याप मिळालेला नाहीये. आता मे महिना उजाडला आहे आणि अद्याप मार्च-एप्रिल महिन्यांचा लाभ रखडला आहे. त्यामुळे हप्त्याचे पैसे नेमके कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे. पण आता लाडक्या बहिणींना एकाच वेळी हप्त्याचे 3000 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मार्च-एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या तांत्रिक पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा केला जाणार आहेत. येत्या काही दिवसांत हप्त्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मातृत्व दिनानिमित्त लाडक्या बहिणींना सरकारकडून भेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अद्याप सरकारने महिलांना मातृत्व दिनीही भेट दिली नाही. त्यामुळे मार्च-एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाकड्या बहिणींचे लक्ष लागले आहे. 

3000 की 4500 रुपये येणार?

लाडकी बहीण योजनेंतर्गत आता मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे 3000 रुपये मिळणार की मार्च, एप्रिल आणि मे अशा तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये मिळणार? याकडे लाभार्थांच्या नजरा लागल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेतून 65 लाख अपात्र लाभार्थींना वगळले (Ladki Bahin Yojana)

    'लाडकी बहीण' योजनेचा लाभ सुरळीत सुर राहण्यासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन सरकारने केले होते. ही e-KYC 30 एप्रिल पूर्वी करायची होती. आता अंतिम मुदत संपल्यानंतर, शासनाने या योजनेतून सुमारे 65 लाख अपात्र लाभार्थींना वगळले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. अद्याप सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात यामध्ये सुमारे 246 लाख महिलांची नोंदणी झाली असली, तरी आता पात्र लाभार्थींची संख्या कमी होऊन ती अंदाजे 181 लाखांवर आली आहे.