जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Forecast: राज्यात मुंबई आणि उपनगरांसह अनेक भागाला जोरदार मुसळधार पावसाने झोडपले आहे. अनेक भागात रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते.

मुंबई, नालासोपारा, भिवंडी, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, पालघर, अमरावती, अकोला कोल्हापूर, या शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे येथी अनेक नद्यांना पूर आले आहेत. रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहेत. तसंच, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनासमोर आल्या आहेत. 

आता हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

मुंबईत आज रेड अलर्ट (MumbaI Weather Update)

भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात आज, रविवार, दिनांक 5 जुलै 2026 रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे. दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता IMD ने वर्तविली आहे. तसेच, आज दुपारी 3.22 वाजता समुद्राला 4.19 मीटर उंचीची भरती आहे.

    पुण्यात शहरात यलो तर घाट भागात रेड अलर्ट (Pune Rain Alert)

    पुणे जिल्ह्यात घाट भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर शहर परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. तर खडकवासला धरणाच्या धरणप्रवणक्षेत्रात पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

    जिल्हानिहाय पावसाचा अलर्ट (Maharashtra Weather Update)

    • रेड अलर्ट - पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
    • ऑरेंज अलर्ट- सिंधुदुर्ग, नाशिक घाट, कोल्हापूर घाट, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
    • यलो अलर्ट- पुणे, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात परिसरात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
    IMD Mumbai नुसार

    हेही वाचा - Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार? कृषीमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट… Video