जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update: राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, विदर्भात अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही अकोल्यात तापमान हे 44.5 अंशांच्या वर आहे.. राज्यात अनेक भागात तापमान हे 40 अंशांच्यावर असून उष्णतेची लाट सुरु आहे. तसंच, विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईतही पारा वाढला
नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार (RMC Nagpur), पूर्व विदर्भातील तापमानात काहीशी घट झाली आहे. दरम्यान, अकोल्यात सध्या सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे, जे सामान्यपेक्षा 2.5 अंश सेल्सिअस जास्त आहे. मुंबईतही तापमानात 1 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. मुंबईत पारा 34.2 अंशांवर पोहोचला आहे.
हेही वाचा - Pune-Mumbai Expressway Traffic Jam: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली, पाहा Video
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान खात्यानं पुढील दोन दिवसांत विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भात उष्णतेचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यात आजही काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे.
हेही वाचा - Maharashtra Board Result 2025: केव्हा, कुठे आणि कसा पाहायचा दहावी - बारावीचा निकाल, वाचा सविस्तर एका क्लिकवर
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):
- अकोला: 44.5 (Akola Temperature)
- अमरावती: 42.8 (Amravati Temperature)
- बुलढाणा: 40.8
- ब्रह्मपुरी: 42.2
- चंद्रपूर: 41.8 (Chandrapur Temperature)
- गोंदिया - 37.9
- नागपूर: 41.6 (Nagpur Temperature)
- वर्धा: 42.1
- वाशिम: 42.6
- यवतमाळ: 41.6
- पुणे: 40.2 (Pune Temperature)
- जळगाव: 44.2 (Jalgaon Temperature)
- नाशिक: 40.0 (Nashik Temperature)
- सोलापूर: 44.1 (Solapur Temperature)
- सातारा: 41.2
- सांगली : 41.0
- छत्रपती संभाजी नगर : 42.0
- बीड: 42.9 (Beed Temperature)
- धाराशीव: 42.4
- परभणी: 41.6 (Parbhani Temperature)
- मुंबई: 34.1 (Mumbai Temperature)
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेंतर्गत 2.47 कोटी महिलांना थेट लाभ, अदिती तटकरेंची माहिती